जसे कराल तसे भराल

‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो,  त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात.  उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.
हे सतत पाहिले की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते व वाटते की कर्म सिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे आणि म्हणून आपण ही अनीती अथवा अन्य अधर्माने पैसा मिळवण्यास प्रेरित होतो. परंतु आपला हा फार मोठा गैरसमज आहे.  नेहमी पुण्याचे फळ सुख व पापाचे फळ दुःखच असते. असे असता काही वेळा पाप करणारा माणूस आपल्याला सुख-समृद्धीत वावरताना दिसतो, ते त्याच्या सांप्रतच्या पापकर्माचे फळ नसून त्याने पूर्वी त्याने पूर्वी केलेली काही पुण्य कर्मे त्यांच्या संचितात जमा असतात, ती आता परिपक्व होऊन सांप्रत त्याला सुखरूपी फळे देत असतात आणि सध्या तो करीत असलेली पापकर्मे त्याच्या पूर्व पुण्याईचा जोर असल्याकारणाने फळ दिल्याविना त्याच्या संचितात जमा होऊन राहतात आणि पूर्व पुण्याईचा जोर ओसरताच प्रालब्ध बनून त्याच्यासमोर उभी ठाकतात. पूर्व पुण्याईचा जोर असेपर्यंत पाप कर्मे
माणसाला आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत.
संत कबीर म्हणतात
‘ कबीरा तेरा पुण्यका जब तक रहो भंडार ।
तब तक अवगुण माफ है, करो गुनाह हजार ।।
एकदा दोन व्यक्ती रस्त्यावरून जात होत्या. त्यामध्ये एक खूप चालाख तर दुसरा इमानदार होता.  चालता-चालता त्यांना  रस्त्यामध्ये एक पाकीट पडलेले दिसते.  त्याने ते पाकीट उघडून बघितले, त्यात १,०००/- रुपये होते.  इमानदार व्यक्ती हे सगळे बघत होता.  चालाख व्यक्ती म्हणतो की आपण दोघांनी या पाकीटाला बघितले आहे म्हणून ह्याची अर्धी-अर्धी वाटणी करूया.  इमानदार व्यक्ती म्हणतो, ‘ ज्याचे हे पाकीट आहे, कदाचित त्याचा आज वेतनाचा दिवस असेल, घरी जाताना चुकून रस्त्यात पडले असेल.  जेव्हा त्याला हे समजेल, बिचारा खूप दुःखी होईल. कदाचित त्याने पोलिसांकडे तक्रार केली असेल. जर त्याला हे पाकीट मिळाले तर तो खूप खुश होईल. किती त्याचे आशीर्वाद मिळतील.’ ह्यावर चालाख व्यक्ती म्हणतो, ‘ बघा बुवा, हे आपल्या नशिबामध्ये होते म्हणून त्याचे पाकीट पडले असेल. नाहीतर आत्तापर्यंत ह्या रस्त्यावरून कितीतरी लोक गेली, त्यांना का नाही हा बटवा दिसला. आपल्या नशिबात होते म्हणून तो आपल्याला दिसला.  ह्याला प्रसाद समजून स्वीकार करायला हवे. जर आपण पोलीस स्टेशनला हे जमा केले आणि त्या व्यक्तीच्या नशिबातच नसेल तर पोलीस आपापसात वाटून खातील.  त्याला तर मिळणार नाही.  आणि असं पण आपण चोरी थोडी केली आहे.  आपल्याला तर हे असेच मिळाले. ह्या पाकीटामध्ये त्याचा पत्ता पण नाही, जे आपण त्याला परत करू.  म्हणून माझा तर विचार आहे की ह्या पैशांना आपण वाटून घेऊ. जर तुला नसेल घ्यायचे तर मी हे सर्व पैसे घ्यायला तयार आहे.’  इमानदार व्यक्ती बोलतो की ‘ नाही, मला हे पैसे नको.’  चालाख व्यक्ती ते सर्व पैसे आपल्याकडे ठेवतो.  जसे दोघ पुढे जातात, इमानदार व्यक्तीच्या पायामध्ये जोरात काटा रुततो.  चालाख व्यक्ती लगेच टॉन्ट मारतो, ‘ बघितलं खूप इमानदारीच्या गोष्टी करतोस ना म्हणून तुझ्या पायात काटा रुतला. बेईमानीसे जिओ तो पर्स मिलेगा हाच दुनियेचा हिशोब आहे.’
काही देवता आकाश मार्गाने जात होते. ते हे सर्व काही दृश्य बघतात आणि आपापसात चर्चा करतात की ‘ हे काय चाललंय ? चालाख व्यक्तीला बटवा मिळतो आणि इमानदार व्यक्तीला काटा टोचतो.  वाटते की चित्रगुप्ताच्या हिशोबामध्ये काहीतरी गडबड आहे. सगळे जण लगेच ईश्वराकडे जातात आणि सांगतात की आम्ही भूतलावर विचित्र दृश्य बघितले. असे वाटते की चित्रगुप्ताच्या हिशोबामध्ये गडबड आहे.  ईश्वर सांगतो की, ‘ चित्रगुप्ताच्या हिशोबामध्ये गडबड होऊच शकत नाही.’ तेव्हा देवता बघितलेले दृश्य ईश्वराला सांगतात. देवतांच्या संतुष्टीसाठी ईश्वर चित्रगुप्ताला बोलावतात आणि दोघांच्या कर्माच्या हिशोबाची वही आणायला सांगतात.  जेव्हा दोघांची हिशोब वही बघितली तर असे आढळून येते की आटा जो चालाख व्यक्ती आहे तो पाहिले खूप इमानदार होता आणि त्याच्या इमानदारीच्या फलस्वरूपामध्ये खूप मोठी प्रालब्ध मिळणार होती.  त्याने चांगले कर्म केले होते, इतकी इमानदारी होती की त्याच्ये भले मोठे भाग्य प्राप्त होणार होते.  पण ते भाग्य प्राप्त होण्याआधी त्याची अंतिम परीक्षा त्याच्यासमोर आली. ह्या परीक्षेमध्ये मात्र त्याचे धैर्य समाप्त होते आणि तिथून त्याच्या जीवनाचा मार्ग बदलतो आणि तो बेईमानीचा रस्ता अवलंबतो. हा चुकीचा रास्ता निवडल्याने ती प्रालब्ध कमी होता-होता इतकी कमी होते की फक्त त्याला १,००० /- रुपये मिळतात.  ज्याच्या साठी तो बोलतो की हे मला नशिबाने प्राप्त झाले आहे. आणि जेव्हा इमानदार व्यक्तीचा हिशोब बघितला तेव्हा असे आढळले की तो पाहिले खूप चालाख होता, त्याच्या ह्या कर्मामुळे त्याला मोठ्यात मोठी शिक्षा मिळणार होती. परंतु शिक्षा मिळण्याआधी एकदा सुधारण्याचा लास्ट चान्स त्याला दिला. त्याने तो मोका घेतला.  तिथून त्याने आपले जीवन सुधारले आणि खूप सुंदर इमानदारीने जीवन जगणे सुरु केले. त्याची शिक्षा कमी होता होता फक्त एक काटा टोचण्या इतकीचं उरते. त्याला जो काटा टोचला तो त्याच्या इमानदारीचे फळ नसून पूर्वीच्या चालाखीच्या जीवनाची शिक्षा होती. त्याला तेवढीच शिक्षा मिळणे बाकी होते. आणि चालाख व्यक्तीला जे हजार रुपये मिळाले ते त्याच्या बेईमानीचे नाही  परंतु इमानदारीने पुण्य जमा होते त्याची प्राप्ती आहे.
या जन्मी न्याय-नीतीने वागणारी कित्येक माणसे दुःख-दारिद्रयात पिचत असताना दिसतात. त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांची पूर्वकृत दुष्कृत्ये आता आपला प्रभाव दाखवीत असतात. त्यांची या जन्मातील सत्कृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्यांना सुख-सुमृद्धी देणारच यात तिळमात्र ही संदेह नाही कारण कर्म-कायदा हा एकमेव कायदा आहे ज्यात अणू-रेणू त्रुटी नाही, म्हणून प्रत्येकाने वर म्हटल्याप्रमाणे जगात काही तात्कालिक विपरीत असे प्रत्ययाला आले तरी कर्म-सिद्धांत कायद्यावर आपला शंभर टक्के विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्याय-नीतीचा सच्चाईचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये.

Continue Reading

नवरात्री

आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत.अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो. काली , दुर्गा, अम्बा , लक्ष्मी ….. ह्या देवींचे गायन-पूजन केले जाते. ह्या सर्व देवी ज्यांना शक्तीस्वरुपा ही  म्हटले जाते. अष्ट भूजाधारी अस्त्र-शस्त्रानी सुशोभित असे रूप दाखवले जाते. देवी आणि हिंसा ह्या दोन विरोधाभासी गोष्टी त्यांच्यामध्ये दाखवल्या  जातात. एकीकडे वात्सल्य रूप आई (माता ) म्हटले जाते. तर दुसरीकडे असुर सहारिणी ही दाखवली जाते. अर्थातच ह्या सर्व देवी पवित्रता, स्नेह, शक्तीचे प्रतिक आहेत. पण त्याच बरोबर दुर्गुणाचा नाश करणारी शक्ती ही आहे. पौराणीक कथांमध्ये चंड, मुण्ड, निकुंभ ,…. अश्या अनेक असुरांचा नाश करणारी शक्तिरूपा देवींचे गायन केले आहे. व्यावहारिक जीवनामध्ये जर आपण बघितले तर हि आपलीच प्रतीके आहेत. आज आपले युद्ध कोणा व्याक्तीबरोबर नसून स्वतः च बरोबर आहे. म्हणून ह्या दुर्गुणांना समाप्त करण्यासाठी अष्ट शक्तीना धारण करण्याची गरज आहे.त्यासाठी आपण नऊ दिवस जागरण, व्रत, उपवास करतो. ह्या सर्वाचे आध्यात्मिक अर्थ आपण जाणून घेऊ या.

नवरात्री ज्यामध्ये प्रथम दिवशी घटस्थापना केली जाते. मातीच्या सजवलेल्या घटामध्ये दिवा लावला जातो व त्याची घरामध्ये, मंदिरामध्ये स्थापना केली जाते. मातीचा घट हे ह्या नश्वर शरीराचे प्रतिक आहे व त्यात लावलेला दिवा हा चैतन्य शक्ती आत्म्याचे प्रतिक आहे. शरीर साधन आहे परंतु आत्मा चैतन्य आहे म्हणून अष्ठ भूजाधारी असे रूप देवींचे दाखवले जाते. ज्या मनुष्याने ही  आत्मज्योत प्रज्वलित केली तोच दुर्गुणाचा नाश करण्यासाठी ह्या अष्ट शक्तींचा वापर करू शकतो. स्नेह आणि शक्ती चे संतुलन ठेवून आपली  सर्व कर्तव्ये  पार पडू शकतो. आत्मज्योती ला जागवणे म्हणजेच खरे जागरण.व्रत अर्थात दृढ संकल्प करणे. आपल्या सर्वांमध्ये काही चुकीच्या सवयी आहेत जसे रागावणे, खोटे बोलणे, दुखी होणे…. ह्याना समूळ नष्ट करायचे असेल तर शक्तिशाली संकल्प करणे आवश्यक आहे. पण आपण काही पदार्थ न खाण्याचे व्रत घेतो, आज कोणत्याही परिवर्तनासाठी दृढता हवी. तसेच उपवास म्हणजे ईश्वरीय स्मृती मध्ये राहणे.तेव्हाच आपल्यामध्ये ह्या शक्तीचा संचार होईल.प्रभू स्मृती मध्ये राहण्याचा अभ्यास फक्त काही दिवसांसाठी नाही पण त्याला आपल्या जीवनाची धारणा बनवावी.अशी ज्ञानयुक्त प्रेरणा देणारा हा नवरात्री उत्सव.

अष्टभुजा हे आत्म्याच्या आठ शक्तीचे सूचक आहे. प्रत्येक शक्तीचे महत्व आपल्या जीवनात आहे. त्यातील एक ही शक्तीची कमी असेल तर जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. म्हणून ह्या शक्तींचे महत्व व त्याचे रूप ह्यांना जाणून घेऊया.
पार्वती देवी ( विस्ताराला संकीर्ण करणे ):-
आज मनुष्या समोर समस्यांची मालिका चालू आहे, रोज तिचे नवे रूप. अश्या वेळी त्या परिस्थिती वर जास्त विचार करण्याची सवय ह्या मनाला लागते. पण विस्तार केल्याने वेळ, शक्ती, संकल्प… ह्यांचा फक्त खर्चच होतो. जितक्या कमी वेळात त्याला साररुपात समजू तितके आपण समाधानावर विचार करू शकू. एखादा रुग्ण डॉक्टर कडे जातो तेव्हा डॉक्टर कधी हे विचारात नाही कि हा आजार का झाला पण तो लगेच त्याचा इलाज सुरु करतो.तसेच आपण हि प्रश्नार्थक न बनता शोर्ट मध्ये परिस्थिती चे गांभीर्य समजून पुढे  जावे. अशी सवय लावल्याने मनाची शक्ती टिकवून ठेऊ शकतो.ह्या शक्तीचे प्रतिक पार्वती देवी दाखवली जाते. शंकर तपस्येमध्ये मग्न असले तरी पार्वती देवी आपल्या जवाबदाऱ्या पार पाडते अर्थात आपण गृहस्थ जीवना मध्ये राहूनच हि practice करावी. तसेच पार्वती देवी बरोबर गाय दाखवली जाते. गायी ला शुभ मानले जाते. तसेच तिचे प्रत्येक अवयव उपयोगी पडतात जसे दुध, तूप, शेण…. ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अर्थात नवजीवन देण्याची क्षमता गायी मध्ये आहे. जेव्हा आपल्यामध्ये साररुपात बाबींना समजण्याची कला येते तेव्हा शक्तिशाली बनून आपण  दुसऱ्यांना बळ देऊ लागतो.रोज सकाळी थोडासा वेळ स्वतःला बाहेरच्या वातावरण पासून detach करण्यासाठी काढावा. एका तासामधला एक मिनिट जर स्वतः  ला detach करण्यासठी दिला  तर परिस्थितींच्या प्रभावापासून मुक्त राहू शकू. पार्वती अर्थात परिवर्तना साठी तयार. काही मनुष्य व्यक्ती, परिस्थिती च्या परिवर्तनाची वाट बघतात. किवा आपल्या दुःखाचा दोष दुसऱ्याला देतात. पण ज्याच्या कडे detach, साक्षी होईल समस्यांना बघन्याची कला आली ते सहज परिवर्तना साठी तयार होतात.

दुर्गा देवी (समेटण्याची शक्ती ):-
आजची वर्तमान परिस्थिती आपल्याला अचानक येणाऱ्या सर्व घटनांसाठी तयार राहण्याचा मौन संदेश देत आहे. ‘श्वास का क्या  विश्वास’ म्हणजेच आपला अन्त कधी आहे ते आपल्यालाच माहित नाही. एक दिवस सर्वांनाच जायचे आहे म्हणून कोणतीही गोष्ट पकडून ठेऊ नका. आज मनामध्ये जुन्या गोष्टी, कोणी केलेले नुकसान, अपमान… खूप काही जमा केलेले आहे. जर ह्या गोष्टीना आपण सोडले नाही तर आत्मा दुसऱ्या जन्मामध्ये त्या सर्व गोष्टीना घेऊन जाईल. ते दुःख एका सावली प्रमाणे बरोबर राहील. म्हणून झालेल्या सर्व बाबींना लगेच विसरण्याचा प्रयत्न करावा. मनामध्ये गाठ बांधून ठेऊ नये. तसेच आपल्या हातून काही अनिष्ट घडले असेल तर त्याचाही पश्चाताप होतो. त्याना विसरणे ही  मुश्किल. अश्या अनेक भावनांनी भरलेले आपले मन शक्तिशाली कसे असू शकेल? तसेच काहीना दुसऱ्या कडून खूप अपेक्षा असतात त्या पूर्ण नाही झाल्या तर त्यांचा पण मनात गोंधळ चालत राहतो. त्या इच्छा मनात घर करून जातात. पण आपण सर्व जाणतो की आपण काहीच बरोबर घेऊन जाणार नाहीत. जाणार ते आपलेच स्वतः चे कर्म, त्यावर आपले लक्ष असावे.तेव्हाच आपण सर्वाना स्वीकार करू शकतो  म्हणून ह्या शक्तीचे प्रतिक दुर्गा देवी दाखवली जाते. जिला आई म्हटले जाते. प्रेम आणि शक्तीचे प्रतिक आहे. जो व्यक्ती जुन्या गोष्टीना लवकर सोडत जाईल तोच दुसऱ्यांशी प्रेमाने व्यवहार करू शकतो व शक्तिशाली स्थिती बनवू शकतो.दुर्गादेवीच्या हातामध्ये शस्त्र असली तरी नयन स्नेहमयी दाखवले जातात. आणि शेरावली ही म्हटले जाते अर्थात विकारांच्या मोठ्या रूपावर विजय मिळवणे. माफ करण्याची शक्ती असेल तर मनाने  हलके राहू शकतो.आत्म्याची ही दुसरी शक्ती आहे जिला दुर्गारुपाने दाखवले आहे.

जगदम्बा  देवी ( सहन करण्याची शक्ती ):-
आज प्रत्येकाच्या मुखाद्वारे  हे शब्द ऐकायला मिळतात कि ‘मी खूप सहन केलं , माझ्या जागी कोणी दुसरे असते तर माहित नाही त्याचे काय झाले असते…..’पण खरतर असे बोलून आपण आपली शक्ती कमी करतो, त्याला बांध घालतो.मी किती सहन करू, कोणा कोणाचे सहन करू. कुठ पर्यंत करू … असे अनेक प्रश्न सहन करण्याला घेऊन आपल्या कडे आहेत.पण आपण तेव्हा सहन करतो जेव्हा आपल्याकडे दुसरा कोणता मार्ग नसतो. ज्या लोकांबरोबर आपण राहतो त्यांना सोडू शकत नाही, job दुसरा मिळू शकत नाही…. अश्या जेव्हा समस्या आपल्या समोर असतात तेव्हा आपण सहन करतो. पण सहन करणे म्हणजे झालेल्या गोष्टीना मनापासून विसरणे. आपण तर सर्व गोष्टीना पकडून ठेवतो आणि म्हणतो कि खूप सहन केल.मनात पकडून ठेवलेल्या गोष्टी आपल्या शक्तींचा ऱ्हास करतात. सहनशक्ती चे प्रतिक जगदम्बा देवीला दाखवले जाते. सहन करण्यासाठी आपली स्थिती आई समान बनवण्याची आवश्यकता आहे. आई जसे मुलाच्या सर्व गोष्टीना स्वीकार करते पण त्याच बरोबर परिवर्तन करण्याची शक्ती सुद्धा असते तसेच आपण पहिले आपल्या मनाच्या सर्व गोष्टीना समजण्यासाठी वेळ द्यावा.जेव्हा असा वेळ देऊ तेव्हा सर्वाच्या संस्कारांना समजून घेऊ शकतो मग तुम्ही घरी, ऑफिस किवा एखाद्या संघटने मध्ये असतील तिथे तुम्ही शक्ती बनून कार्य करू शकता.
जेव्हा आपण प्रसंगांना let go करू तेव्हाच आपण सहन करून सर्वांचा स्वीकार करू शकतो. हे सर्व natural होईल.त्यासाठी मेहनत नाही लागणार.

संतोषी माता (सामावून घेण्याची शक्ती ):-
आपल्यामध्ये सर्व शक्ती आहेत पण आपण काहींचा उपयोग करतो, काहींचा नाही. पण ह्या सर्व आत्म्याच्या powers आहेत. सामावून घेणे म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया.कधी कधी लोकांना असे  वाटते कि जे जसे आहेत मग कोणी चुकीचे वागत असेल तरी त्याला सामावून घ्या, पण तसे नाही. आपल्याला माहित आहे कि सर्वांचे संस्कार वेगळे आहेत,ते भिन्न असले तरी त्याच्या गोष्टीना पकडून न ठेवणे.मनामध्ये हे असे का,कशाला, कुठे, केव्हा…. अश्या प्रश्नांची रांग लागते.पण प्रोब्लेम चे चिंतन करण्यापेक्षा जे जसे आहे त्याला स्वीकार करून पुढे समाधान शोधणे. ही शक्ती धारण करण्यासाठी संतुष्टते चा गुण आणावा. जितक आणि जस मिळाले त्यात समाधानी राहावे कारण खूप अपेक्षा असतील तर सामावून घेणे कठीन जाईल. म्हणून ह्या शक्तीला संतोषी मातेच्या रुपामध्ये दाखवले आहे. जिच्या  हातामध्ये तांदूळ दाखवले जातात. जी व्यक्ती समाधानी तसेच सर्वांना सामावून घेते तीच आपल्या जीवना  मध्ये संतुष्ट राहू शकते.
गायत्री देवी (पारखण्याची शक्ती ):-
आज आपल्या समोर एखादी समस्या आली तर आपण दहा लोकांना विचारतो कि काय करायला हवे. म्हणजेच पारखण्याची शक्ती नाही. जेव्हा व्यक्ती स्वतःला समजून घेतो, focus स्वतः वर ठेवतो तेव्हा त्याच्या मध्ये  चांगले-वाईट ची समज वाढते. व्यक्ती, परिस्थिती चे फक्त बाह्य रूप न बघता त्याचा खोलवर विचार करतो. म्हणून गायत्री देवी दाखवली जाते.जिच्या हातामध्ये स्व दर्शन चक्र व शंख , हंस आसन दाखवले जातात.स्वदर्शन म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये मला माझे  विचार, बोल आणि कर्म कसे असावे ह्यावर लक्ष ठेवणे. ज्या आत्म्याने आपल्या व्यवहाराला नियंत्रित केले, ज्याच्या कर्मांमध्ये कोणत्याही प्रकारचे मिश्रण नाही असा व्यक्ती सर्वांचे भले करू शकतो. कारण त्याची बुद्धी शुद्ध पवित्र आहे. अश्या व्यक्तींचे  जीवन सर्वाना प्रेरणा देणारे ठरते. गायत्री देवी चे वाहन हंस दाखवला जातो.हंस मोती चा स्वीकार करतो. अर्थात शुद्ध बुद्धी चांगले आत्मसात करून वाईटाचा त्याग करते.आज आपल्याला  कोण चांगले कोण वाईट हे समजत नाही त्यामुळे नुकसान होते. म्हणून पारखणे आवश्यक आहे. रोज मनाला शांत करण्याची व ध्यान करण्याचा अभ्यास केला तर नक्कीच लोकांच्या वायब्रेशन्स ना catch करू शकतो.

सरस्वती देवी ( निर्णय करण्याची शक्ती ):-
अचूक पारखता आले तर निर्णय करणे सहज होते. कारण कोणताही निर्णय आपले व दुसऱ्याचे भाग्य बनवतो. प्रत्येक निर्णय आपल्या जीवनावर परिणाम करतो . म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा.तसेच जो निर्णय घेतला आहे त्यावर तटस्थ राहावे.तेव्हा आत्म्याची शक्ती वाढते.त्याचबरोबर आपण दुसऱ्यांचा जीवनाचे निर्णय न घ्यावे कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. सल्ला अवश्य द्यावा पण तसेच करावे हा अट्टाहास नसावा. प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, ह्या कर्म सिद्धांताला लक्षात ठेवावे. म्हणून ह्या शक्तीचे प्रतिक सरस्वती देवी ला दाखवले आहे जिच्या हातामध्ये वीणा आहे. आपल्या जीवनाची script स्वतः लिहिणारे. स्वतः चे निर्णय, मते स्वतः ठरवणारे पण त्याचबरोबर सर्वांबरोबर राहणारे असे संतुलन ठेवणारे जीवन त्यांच्या मध्ये दिसून येते. म्हणून सरस्वती देवी च्या हातामध्ये माला दाखवली आहे.

काली देवी ( सामना करण्याची शक्ती ):-
ह्या शक्तीला थोडे समजून घेऊ या कारण जिथे सामना करायचा तिथे सहन करतो व जिथे सहन करायला हवे तिथे सामना करतो.त्यामुळे समस्या समाप्त होण्याएवजी वाढत जातात.म्हणून ह्या शक्तीला कालीदेवी च्या रुपामध्ये दाखवले जाते.बाकीच्या शक्ती सकारात्मक उर्जा निर्माण करतात. प्रेमाने, समजुतीने परिस्थितीला तोंड द्यायला शिकवतात पण ही शक्ती आपल्याला अन्याय, चुकीच्या गोष्टींचा सामना करायला शिकवते. जसे काळी देवीचे रूप भयंकर दाखवले जाते, बाकीच्या देविंसारखा शृंगार ही नाही कारण ही शक्ती सर्वप्रथम आपल्या कमीना समाप्त करण्याची प्रेरणा देते.जसे काही चुकीच्या सवयींना आपण चालवून घेतो मग त्या आपल्या असो किवा दुसऱ्यांच्या. ज्या व्यक्ती मध्ये काही कमी असतील तो दुसऱ्यांच्या कमीचा सामना करू शकत नाही. म्हणून काली देवीच्या गळ्यामध्ये असुरांची मुंड माला दाखवली आहे तसेच हातामध्ये असुराचे डोके. अर्थात सर्व कमीना समाप्त करण्यासाठी त्याचे मूळ समाप्त करणे आवश्यक आहे ते म्हणजे देह अभिमान ( body conciousness).  हा विकार जर राहिला तर त्याच्या पाठी सर्व विकार पुन्हा जन्म घेऊ शकतात. जागृत  राहून ह्या कमीना नष्ट करू या.

लक्ष्मी देवी ( सहयोग शक्ती ):-
जर ह्या सात शक्ती आपल्या मध्ये आल्या तर आपण let go करणे, बाबींना विसरणे, कठीण परिस्थिती मध्ये अचूक निर्णय करणे, सहन करणे …. ह्या सर्व गोष्टी सहज करू लागतो. समस्येमध्ये स्वतः ला शांत ठेवून ही आपण सहयोग देतो.म्हणून ह्या शक्तीचे प्रतिक लक्ष्मी देवी दाखवली आहे. कमलासिनी अर्थात ह्या कलियुगामध्ये राहून स्वतःला अलिप्त ठेवणे. प्रत्येक संकल्प, बोल, कर्म पवित्र आणि सुखदायी बनवणे.
वातावरण, व्यक्ती..ह्यांचा प्रभावापासून मुक्त असलेली आत्मा दुसऱ्याला positive energy देऊ शकते .विचारांचे परिवर्तन सर्व गोष्टीना परिवर्तन करते. लक्ष्मीदेवीचे  हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून  देऊ शकते.
अश्याप्रकारे ह्या सर्व शक्तींचे आपापसात सूक्ष्म संबंध आहेत . एका शक्तीची कमी असेल तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम होतो , म्हणून meditation च्या अभ्यासाने ह्या शक्तींना आत्मसात करू या.वेळोवेळी ह्यां शक्तींचा वापर करून त्यांचा अनुभव करू या . ह्या सर्व शक्तींना शिवशक्ती म्हटले जाते. ईश्वराकडून शक्ती घेऊन आपण स्वतः ला शक्तिशाली बनवू या.

Continue Reading

क्षमाशीलता

मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक शुभाशुभ घटना घडत राहतात. त्यांचा परिणाम सतत आपल्या मानसिकतेवर होत असतो. मनामध्ये निर्माण झालेल्या भावनांनी आपले बोलणे, चालणे, वागणे, लिहिणे आणि सर्वच प्रभावीत होत असते. म्हणून मानसिक शांती आणि निरामय आरोग्यासाठी का होईना इतरांना व स्वतःला सुद्धा  क्षमा करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर आपल्याला संपूर्ण आरोग्य आणि सुख हवे असेल तर ज्या व्यक्तींनी आपल्याला दुखवले आहे त्या प्रत्येकाला माफ करायला हवे.

ह्या छोट्याशा जीवना मध्ये जाणता अजाणता आपल्या कडून ही अशा काही चुका झालेल्या असतात की त्यांना आपण स्वतः विसरू शकत नाहीत. अपराधभाव घेऊन जगात असतो. त्या भावनेतून स्वतःला समजुतीने मुक्त करणे गरजेचे आहे नाहीतर ती चुकीची भावना ही आपल्याला दुःखाचा दरी मध्ये घेऊन जाईल. रागाच्या भरात केलेला खून, मारहाण, अपशब्द ….. ह्या सर्व घटनाचा सुद्धा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. जसे शरीरामध्ये दर अकरा महिन्यांनी प्रत्येक पेशी नव्याने तयार होतात जसे आपण नव्याने तयार होतो म्हणून झालेल्या घटनांना उगाच उगाळत बसण्यापेक्षा केलेल्या चुकाची मनापासून त्या व्यक्तीची तसेच ईश्वराची माफी मागून पुन्हा ही चूक नाही होणार ह्याची शाश्वती देऊन स्वतःला मोकळे करावे.

क्षमाशीलता एक कला आहे व या कलेचा मुख्य घटक आहे क्षमा करण्याची तयारी. ज्या व्यक्तींनी दुखावले गेले आहोत अशा व्यक्तींना आपण क्षमा करण्यास सहसा तयार होत नाहीत. इतके निष्ठुर होतो की एखादया समोर आपण बोलून ही जातो की ‘काहीही झाले तरी मी हयाला माफ करणार नाही.’ किवा ‘मरे पर्यंत त्याचे तोंड ही बघणार नाही.’ अशाप्रकारच्या द्वेष, तिरस्काराने भरलेली नकारात्मक भावना मनात ठेवून आपण जीवनभर चालत राहतो. पण ह्या भावनांचा त्रास फक्त आपल्यालाच होतो. मन हे आजारांचे कारण आहे असे मानणाऱ्या मनोदेहिक वैदयकीय क्षेत्रात आज सतत या गोष्टींवर जोर दिला जातो की द्वेष, धिक्कार, पश्याताप आणि शत्रुत्व या भावनांमुळे सांधेदुखी पासून ते हृदय रोगापर्यंत अनेक आजार उद्भवतात. या नकारात्मक भावनांमधून निर्माण होणारा ताण आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला कमकुवत करतो आणि आपण कोणत्याही जन्तुसंसर्गाला (infection) सहज बळी पडू शकतो. ह्या सर्वांपासून स्वताचा बचाव करण्यासाठी सर्वप्रथम दुसऱ्याना क्षमा करण्याची तयारी ठेवावी.

दुसऱ्याना क्षमा करणे म्हणजेच स्वतःला भावनिक दृष्ट्या मुक्त करणे होय. जर आपण त्या व्यक्तींना, घटनांना वारंवार आठवत राहिलो तर तो साचलेपणा आपल्यालाच हानिकारक ठरेल. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीची आठवण येईल तेव्हा व्यक्तीचे भले चिंतून म्हणावे, ‘तुला शांती मिळो.’ हे सतत केल्याने काही दिवसांनी त्या व्यक्तीचे किवा त्या घटनेचे विचार कमीत कमी वेळा आपली मनात येतील व शेवटी त्याच्या खूनाही पुसून जातील.

जसे सोन खरे आहे की नाही हे पारखण्यासाठी सोनार आम्ल चाचणीचा उपयोग करतात. आपण ही आपली क्षमाशीलतेची आम्ल चाचणी (ACID TEST) करून घ्यावी. जर आपल्याला दुखावणाऱ्या, फसविणाऱ्या, लुबाडणाऱ्या व्यक्तींबद्दल कोणी खूप चांगले बोलत आहे, त्यांचे ते चांगले बोलणे ऐकून जर माझ्या काळजातून असूयेचा धूर निघू लागला तर हमखास समजावे की आपल्या मनात अजून ही त्या व्यक्तीबद्दल तिरस्काराची भावना शिल्लक आहे. म्हणजेच आपण मनापासून त्याला माफ केले नाही. जर खरोखरच आपण माफ केले असेल तर भले ती घटना आठवेल पण आता त्यातील विखार व दंश आपल्याला जाणवणार नाही. हीच खरी क्षमाशीलतेची असिड टेस्ट आहे.

खरतर प्रत्येक घटनेकडे आपण कोणत्या दृष्टीकोनाने बघतो हे जाणणे महत्वाचे आहे. चांगले वा वाईट असे काही नसतेच. विचार एखाद्या गोष्टीला चांगले वा वाईट बनवतात कारण प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. आपण त्या घटनेची कोणती बाजू पाहतोय हे आपल्या विचारांवर निर्भर असते. प्रत्येक घटनेपाठी काही चांगले लपलेले आहे ते पाहण्याचा ध्यास असेल तर आपण कोणालाही गालबोट लावणार नाहीत. उलट प्रेमाचा वर्षाव करून स्वतःला व प्रत्येकाला क्षमा करू.आपल्याला दुखावणाऱ्या साठी आनंद, जीवन आणि सदभावनेचे अभीष्टचिंतन करू.

निसर्ग, जीवन आणि ईश्वर आपल्याला सर्वांवर प्रेम करण्याची शिकवण देतात. निसर्गाचे मनुष्याने कितीही नुकसान केले तरी त्याला वेळोवेळी ऊन, पाऊस देऊन नवीन जीवन देण्यासाठी निसर्ग तयार असतो. कितीही आपण चुका केल्या तरी ईश्वर आपल्याला नवी संधी देऊन पुन्हा नव्याने उभे राहण्याची शक्ती देतो तसेच आपण ही स्वतःला व दुसऱ्यांना माफ करून त्यांचासाठी प्रेम, शांती, आनंद ह्यांची याचना करून आपल्या भावनांना द्वेष, तीरास्कारापासून मुक्त ठेवावे. हीच तर खरी जगण्याची कला आहे.

Continue Reading

मन को अपना मित्र बनाये

आज मनुष्य ने अपने बुद्धिबल से बहुत कुछ हासिल किया है| कुछ सालो पहले जो बाते असंभव लगती थी, वह आज सबकुछ नजरो के सामने प्रत्यक्ष हो रहा है| बचपन में दूर बैठे इन्सान को अपनी मन की भावनाए पहुचाने के लिए पत्र, तार भेजते थे| उनसा जवाब कब आएगा उसका इंतजार करना पड़ता था| विदेश में रहनेवालों के लिए तो और ही राहे तकनी पड़ती थी| लेकिन आज विज्ञान ने कहा पर भी बैठे हुए रिश्ते तक अपनी भावनाए १ सेकेंड में पहुचाने वाले साधन बनाकर दिए है| लोगोंसे बात करना, किसी को ढूंढना, रिश्ते बनाना बहुत आसन हुआ है| बाहर की और मनुष्य प्रगत हो रहा है लेकिन अन्दर की और उतना ही खाली| अपनोंसे, अन्जानोसे बात करना जितना आसान उतना खुद से बात करना मुश्किल लग रहा है| अपने से दुरी बढती जा रही है| इसी दुरी के कारण मनुष्य सुख-शांति से भी दूर होता जा रहा है|

        किसी को भी हम पूछते है की जीवन में क्या चाहिए? तो जरुर यही जवाब मिलता है की ‘सुख-शान्ति चाहिए’, वो कहा और कैसे मिलेगी इसकी खोज में इन्सान भटक रहा है| कभी मंदिर,जंगल, बगीचा, पहाड़, सागर का किनारा, गुफा… कितनी जगहपर ढूंढ लिया लेकिन अपने उंदर जाकर ढूंढने की समझ किसीने नहीं दी|हर चीज बाहर खोजी, किसी से मांगी मगर यह ऐसी चीजे है की किसी स्थान पर न मिल सकती है न कोई दे सकता है| हमें जो चाहिए वह सबकुछ अपने अन्दर ही मिल जायेगा| वह पाने के लिए मन की अपना मित्र बनाने की आवश्यकता है|

       वर्तमान समय छोटे बच्चों से लेकर बुजुर्ग इन्सान तक हर किसी को friends बनाना अच्छा लगता है| facebook, whatsapp, twitter…. इनसे हम अनजान व्यक्तिओंसे रिश्ते बना रहे है लेकिन खेद की बात तो यह है की हम अपने मन को मित्र नहीं बनाने में असफल हो रहे है| मन को तो पूरा दिन इधर से उधर भटकते रहते है| जिसके साथ बैठकर बात करने से हर कार्य संभव हो सकते है, छिपी हुए शक्तियों के खजाने मिल सकते है, प्रगति के सरे द्वार खुल सकते है…. उसको मित्र बनाने के बजाय हम इन्सान को मित्र बनाकर अपना समय, शक्ति… कितना कुछ व्यर्थ गवाते है| मन लो किसी व्यक्ति से मित्रता करते है लेकिन उससे कोंसी बातचीत करते है? इसलिए अगर हमें सुख-शान्ति का अनुभव करना है तो सर्वप्रथम अपने लिए समय निकाले|

        हमारा मन बहुत आज्ञाकारी है| वह हमें कई बाते accurate बताता है| आपने अनुभव किया होगा की रात को जिस सोच को लेकर आप सोये हो, आँख खोलते है तो पहले वही सोच आ जाती है| जैसे mobile में कोई app खोलकर उसे पूरा बन्द न किया हो तो जब उसे खोलते है तो पहले वाली चीज आपको दिखाई जाती है वैसे ही मन हमें रोज बताता है की आप किन विचारो को लेकर सोये थे| अगर वह विचार व्यर्थ, नकारात्मक, तनाव या दुःख से भरे हे तो आँख खोलने के बाद उन्ही विचारोंसे शुरुवात होती है| इसलिए मन को व्यर्थ दिशाओं में दौड़ाने के बजे उसे सही रह पर लेकर आये| मन में व्यर्थ विचार उठते हो तो सकारात्मक, श्रेष्ठ विचार देने की प्रैक्टिस करे| बार-बार उसे व्यर्थ से समर्थ की और लेकर आए क्योकि व्यर्थ सोचने की आदत भी तो उसे हमने ही डाली है|

       जैसे किसीको रोज चटपटा खाने की आदत पद जाये तो बिना मिर्च मसालेवाले पदार्थ अच्छे  नहीं लगते वैसे ही शुरुवात में अच्छे विचार करना boiring लग सकता है मगर उसी से हमारे मन की सेहत अच्छी बनेगी| मन लो आपके मित्र को शराब पीने की लत लग गयी हो तो  बार बार उसके कदम किस और जायेंगे? वैसे ही इस मित्र को तनाव, दुःख, उदासी…. बारे विचारों की आदत पडी है, उसे प्यार से, धीरज से सही रस्ते पर लाना है| दिन में कुछ ऐसे कार्य होते है जहा हमें बहुत ज्यादा सोचने की जरुरत नहीं होती| जैसे स्नान करना, चाय पीना, पैदल करना…. उस समय पर जागरूकता से मन में श्रेष्ठ विचार लाये| मै बहुत खुश हु, जो भी मुझे मिला है उसके लिए मै भगवन का शुक्रगुजार हु, सबकुछ अच्छा है, हर बात में कल्याण है….ऐसी सोच रखने से हमें खुद को अच्छा लगेगा| विचार शांत होने लगेंगे| धीरे-धीरे उलझाने समाप्त होने लगेगी| इसलिए इस मन मित्र के साथ बात करने में समय बिताये| अगर वह आपको साथ देना शुरू करे तो दुनिया की कोई व्यक्ति, हालाते, समस्याए आपको हिला नहीं सकती| यह दोस्त ऐसा है की आपको हर पल, हर परिस्थिति में साथ देगा| सिर्फ ये ध्यान दे| उसके साथ प्यार भरी बाते करे| अपने लिए, इस दोस्त के लिए समय निकाले | इसलिए कहते है ‘ मन जीते जगतजीत ’| इसको अपना बनाया तो सारा जग अपना लगने लगेगा| इसपर जीत पायी तो सारे जहाँ को जीतने की समर्थि आपमें आएगी

Continue Reading

करदर्शन

 

कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती |

करमध्ये तु गोविद: प्रभाते करदर्शनम ||

हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आणि मुळस्थानी सरस्वतीचा वास आहे. मध्यभागी ईश्वर आहे म्हणून सकाळी डोळे उघडताच स्वतःच्या हाताचे दर्शन करावे. असे आपली भारतीय संस्कृति शिकवते. लक्ष्मी आणि सरस्वती अर्थात वित्त आणि विद्या ह्यांना प्राप्त करण्याचे बळ आपल्या हातात आहे. तसेच ईशकृपा, ईशप्राप्ति सामर्थ्य ही आपल्याकडे आहे.

व्यावहारिक जीवनात जर आपण बघितले तर कोणतीही प्राप्ति कष्टाशिवाय होत नाही. एक मराठी गाण तुम्ही ऐकल असेल ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’. हाताला चटके मिळल्याशिवय भाकरी मिळत नाही, म्हणजेच पुरुषार्था विना काहीही साध्य होऊ शकत नाही. म्हणुनच सकाळी डोळे उघडताच स्वतःला एक शक्तिशाली विचार देण्याची प्रेरणा ह्या करदर्शनामध्ये आहे. आपल्या हातांना बघुन हा विचार करावा की ‘माझ्याकडे सर्व असंभव कार्य संभव करण्याची शक्ति आहे, कोणतेहि कार्य करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे आहे’. हे विचार रोज करावे. ह्या विचारांनी आपले बळ वाढेल व आपण क्रियाशील होऊ. ‘प्रयत्नार्थी परमेश्वर’ अर्थात प्रयत्न केला तर ईश्वर सुद्धा मिलू शकतो. ठरवले तर काहीही साध्य करू शकतो अशी विशेषता आपल्या हातामध्ये आहे.

वित्त आणि विदया ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त केल्यावर मनुष्याला अहंकार येऊ शकतो. पण ह्या दोन्हीना     ईश्वरासोबत जोडले तर मनुष्यामध्ये नम्रता आणि समर्पण भाव हे गुण येऊ शकतात. सकाळपासून सत्कर्म करण्याची प्रेरणा घेऊन दिवसभर कार्य करावे व रात्रि त्या कार्याची श्रेय ईश्वर चरणी अर्पण करून निश्चिंत व्हावे. ह्या हातांद्वारे दान, पूजा अर्चना असे अनेक सत्कर्म केले जातात पण ह्याच हातानी पापकर्म ही होतात. म्हणून केलेल्या कर्मांचे फळ हस्तरेखेद्वारे बघितले जाते. ज्या हस्तरेखेमध्ये आयुष्य, सुख, विदया, धन, आरोग्य सर्वच बघितले जाते. पण ह्या सर्वाना प्राप्त करण्याचा आधार आपले कर्मच आहेत.

दुसऱ्या दृष्टिकोनाने ह्या हातांना बघितले तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला हातांची साथ हवी. कोणताही अवयव दुखत असेल तर त्याला हाताचेच सहकार्य लाभते. डोळे, नाक, कान, पाय, डोके……. कोणताही अंग असो त्याला मालिश पालिश करुन बरे करतो. ह्या हातामध्ये सर्व काही करण्याचे सामर्थ्य आहे. जीवनाचे ध्येय साकार करणारे, मनुष्याला पुरुश्यार्थाचे प्रोत्साहन देणारे, जीवनाला कार्यशील ठेवणारे, वित्त आणि विद्या ह्यांच्या प्राप्तीसाठी सक्षम बनावणारे तसेच ईश्वराप्रति समर्पण भाव ठेवण्याची श्रेष्ठ स्मृति देणारे हे करदर्शन आहे

Continue Reading

फुलस्टॉप

बचपन में मात-पिता से लेकर टीचर तक हर कोई बोलना, लिखना, चीजों के नाम पहचानना …….. सब सिखाते है और कितना हमें सही आता है उसकी test लेते है | जब हाथ में पेन्सिल पकड़ना भी ठीक से नहीं आता था, तब हम पहले उस पेन्सिल की नोक से बिन्दी लगाना अर्थात विराम (fullstop) की मात्रा लगाते थे | जैसे बड़े होते गए, समझदार अपने आप को कहलाने लगे | उतने ही जीवन के हर दृष्योंको देख सवाल पूछना सीख गए | मन चाहा जबाब नहीं मिलता तब तक सवाल पूछते रहे | कभी अपने से तो कभी औरों से | स्कूल लाइफ में जो मात्रा लिखने में सब से टेढ़ी बाकी लगती थी , मुश्किल लगती थी वो आज सहज लगती है | लेकिन जब कुछ लिखना भी नहीं आता था तब जो मात्रा सहज लगती थी वही मात्रा आज बहुत ही कठिन महसूस होती है |

आज के इस आधुनिक युग में विज्ञान ने मनुष्य को बहुत सारे साधन निर्माण करके दिए है | और नई खोजे करने में वह लगा हुआ है | कोई भी खोज करते समय उस बात को लेकर कई अलग सवाल निर्माण कर उसकी खोज करते रहते है | सवालों में उलझने की जैसे आदत सी पड़ी है | विचारों की गति दिन प्रतिदिन बढ़ती जा रही है | जैसे रोजमर्रा के जीवन में मनुष्य हर कार्य में अपनी गति को बढ़ाना पसंद करता है | गाड़ी fast चलाने में मजा आता है अगर मान लो कोई धीमी गति से चलता है तो उसे ‘थोड़ा तेज चला’ ऐसा कह देते है वैसे ही हमारी सोच भी fast हो रही है | इसको ब्रेक लगाना आज इन्सान को मुश्किल लग रहा है | अपनी ही सोच से परेशान होते जा रहे है | आपने देखा होगा जब इन्सान गुस्से में, बदले की भावना, तनाव, ईर्ष्या ……… के वश होता है तब उसके विचारों की गति बढ़ती है, वही अगर अच्छा सोचना शुरू करो तो गति धीमी हो जाती है | हमें अपनी नकारात्मक सोच को अगर stop करना है, तो हमें अच्छा सोचने की आदत डालनी होगी |

जीवन को नई दिशा देनी हो तो पुरानी बातों को फुलस्टॉप लगाते है | स्कूल लाइफ में जब निबंध (essay) लिखने के लिए कहते थे, तब उसके रुख को बदलने के लिए विराम का चिन्ह लगाते थे | आज वही विराम जिंदगी में लगाने की मेहनत करनी पड़ रही है | पुरानी बातें, पुरानी घटनाएं , पुराने अनुभव उनसे अच्छा लेकर जो ‘ बिता उसे बिंदी लगानी है ’| बिता हुआ कल जिसे भूतकाल कहते है, जब भी उसे याद करो तो वह भूत के समान वह डरावना लगता है, दर्दनाक लगता है | ऐसी बातों को याद कर हम अपने आज को न बिगाड़े | पुरानी बातों को fullstop लगाने के लिए मन शक्तिशाली होना जरुरी है | कमजोर मन व्यर्थ के विस्तार में जाएगा | लेकिन शक्तिशाली मन बातों को मोड़ने की ताकत रखेगा | जिंदगी के हर पड़ाव को पार करना है तो रास्ते में आई हुई हर बातों को पार करना सीखे | आज के, अभी के पल को जीकर देखे तो कल आपे ही सवर जाएगा |

छोटी सी जिंदगी में बहुत कुछ करना बाकी है | इसे व्यर्थ की बातों में न बिताए | इसे ख़ूबसूरत बनाने के लिए सूंदर विचारों को अपने मन में बटोर ले | ऐसे लम्हे अपनी स्मृति में रखे जिन्हे कभी भी याद करे तब सुख की सुगंध महक जाए | बुरी बातों को fullstop लगाकर नयी सोच रख जीवन को नयी दिशा दे |

Continue Reading

प्रथम तुला वंदितो…

      ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा …..’ भारताची महान संस्कृती आपल्याला पहिले वंदन गणरायाला करायला शिकवते. सर्व कार्ये निर्विघ्न पार पाडावी म्हणून प्रथम पूजन श्री गजाननाचे करतो. वर्तमानामध्ये सर्वांसमोर अनेक विघ्ने आहेत. कोरोनामुळे बाल-वृद्ध सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. पण परिवर्तन जीवनाचा नियम आहे. जे काल होते ते आज नाही आणि जे आज आहे ते उद्या नसेलही. म्हणून प्रत्येक क्षणाचा स्वीकार करू या.

        गेल्या वर्षी वाजत-गाजत गणरायाचे आगमन झाले होते. आज social distancing तसेच अन्य बाबींमुळे ह्या उत्सवाचे ते रूप नसले तरी मनामध्ये तोच उत्साह आहे. नव्या उम्मीदेने हा सण साजरा होत आहे. मनामध्ये एक आशेचा दीपक जरूर प्रज्वलित झाला आहे की गजाननाच्या येण्याने आमची सर्व दुःखे दूर होतील व पूर्वीपेक्षा ही चांगले परिवर्तन जीवनामध्ये होईल.

        गणपती आपल्या सर्वांचे लाडके दैवत तसेच पौराणिक कथांमध्ये विघ्नाना दूर करणारी देवता म्हणून ही प्रसिद्ध आहे. लहान असताना सांगितले जायचे की मनापासून ह्याची आराधना केली तर सर्व सुखे दारी येतील. आजही सर्वांना दिलासा मिळत आहे की आता सर्व काही ठीक होईल, जीवनाची गाडी पुन्हा नव्या जोमाने धाऊ लागेल. जिथे कोरोनामुळे भयभीत झाले होतो, मन चिंतेने, समस्येने, निराशेने भरून गेले होते तिथे आज मनाला सुखाचा, नव्या आशेचा स्पर्श होत आहे. आपण फक्त त्यांचे दर्शन न करता, त्यांच्या ह्या आगळ्या-वेगळया रुपामध्ये जे गूढ दडले आहे त्याला समजून त्या सर्व गुणांना जीवनामध्ये उतरवण्याचा ही प्रयत्न करू या.

        गणेशाला गुणपती, गणनायक, विघ्नहर्ता, सुखकर्ता….. अनेक नावानी संबोधले जाते.ही सर्व नावे गुणवाचक आहेत. त्यांचे छोटे डोळे, मोठे पोट, सुपा एवढे कान, वक्रतुंड ……. सर्व अंग आपल्याला समस्येपासून दूर राहायला व समस्यांना दूर करण्याची युक्ती शिकवतात

१)डोळे :–

डोळे दूरदृष्टीचे प्रतिक आहेत. दूरची वस्तू बघण्यासाठी  जसे डोळे छोटे करतो तसेच आयुष्यामध्ये प्रत्येक कर्म दूरदृष्टी ने करावे कारण फक्त आजचा विचार करून एखादे पूल उचलले तर कदाचित भविष्यामध्ये खूप मोठे नुकसान होऊ शकते म्हणून पुढचा विचार करून निर्णय घेण्याची समज ह्या नेत्राद्वारे आपल्याला मिळते.

२)कान :—

सुपासारखे कान हे व्यर्थ, नकारात्मक गोष्टीपासून दूर राहायची प्रेरणा देतात. आज आपला खुपसा वेळ              वायफळ गप्पागोष्टी मध्ये वाया जातोय. जे आवश्यक, सकारात्मक आहे ते एकवे, आत्मसात करावे. बाकी सर्व कचरा समजून सोडून द्यावे. ह्या धारणेला जीवनात जरी आणले तरी आपला वेळ, संकल्प, शक्ती ह्यांचा व्यय थांबू शकतो.

३)सोंड:—

गणरायाची सोंड हीच तर त्यांची ओळख आहे. अर्थात कोणतेही मोठे कार्य सहज पार पाडण्याची शक्ती आहेच पण त्याच बरोबर तेवढीच विनम्रता ही आहे. सोंडेने मोठे वृक्ष मुळापासून उपटण्याचे सामर्थ्य आहे तसेच जे काही ह्या सोंडेमध्ये कोणी देतो ते मालकाला पोचवण्याची विनम्रता ही त्यांमध्ये दिसून येते.आज आपल्यासमोर कोणती समस्या आली तर त्याने न भीता, आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे त्याचा उपयोग करून त्याला नष्ट करावे. ईश्वराचे बळ माझ्यासोबत आहे, त्याची साथ प्रत्येक क्षणाला मला मिळत आहे हा संकल्प ही आपल्याला शक्तिशाली बनवेल व डोंगरेएवढी परिस्थिती राई बनेल. पण कार्यामध्ये यश मिळाले किवा परिस्थितींना पार केल्यावर त्या ईश्वराचे आभार मानायला विसरू नका. कारण जे तो करू शकतो ते आपण करू शकत नाही. त्याचे बळ, त्याची योजना आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणून रोज विनम्रतेने मिळालेल्या यशाचे श्रेय त्याला जरूर दया. ही सुंदर शिकवण ह्या सोंडे द्वारे आपल्याला मिळते.

४)उदर (पोट):—

आज आपल्या जीवनातल्या समस्येचे एक कारण आहे ते म्हणजे सहनशक्तीची कमी. ही शक्ती असेल तर अर्ध्या अधिक समस्या दूर होऊ शकतात. सहन करून सामावून घेण्याची शिकवण ह्या उदाराद्वारे मिळते. एखादी गोष्ट घडली तर त्याची चर्चा दहा लोकांबरोबर करतो. असे केल्याने कित्येकांचे मन दुषित करण्यासाठी निमित्त बनतो. पण त्या गोष्टीला सामावून घेतले तर नक्कीच आपले संबंध चांगले राहू शकतात. आपल्या वाचेवर अंकुश ठेवण्याची समज ह्या लंबोदरा द्वारे मिळते.

५)एकदंत:—

एकदंत हे एकावर प्रचंड श्रद्धा व विश्वास ठेवायला शिकवते. आज जेव्हा आपण समस्यांच्या जाळ्यामध्ये फसतो तेव्हा अनेक देवतांना आठवण करतो. इतकेच नाही पण कोणीही जो सल्ला देईल ते सर्व करायला तयार होतो. पण असे न करता एकावर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण ईश्वर एकच आहे.आपण जिथे श्रद्धा ठेवली आहे तिथून मदत, शक्ती, मार्ग सापडतो पण त्या सर्वोच्च शक्तीवरचा विश्वास तुटू नये याचे भान नक्कीच असावे. ते श्रद्धेचे बळ आपल्याला सर्व विघ्नांमधून सुरक्षित बाहेर काढेल.

        ह्या शिकवणीना जर आपण आपल्या जीवनात,व्यवहारात आणले तर सर्व विघ्नांचे समाधान मिळेल.समस्या दूर होतील. चला ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण काही परिवर्तनाचा शुभ संकल्प घेऊ या. थोड्या वेळासाठी आपल्या जीवान यात्रेला बघू या. ज्या समस्या, दुःख माझ्या वाट्याला आले त्यात माझी काय चूक होती व त्यामध्ये कोणते परिवर्तन करायला हवे ह्याचे अवलोकन करू या. मनापासून झालेल्या चुकांना स्वीकार करून पुढे त्या न व्हाव्या ह्यासाठी स्वतःला प्रतिज्ञा बद्ध करू या. सर्व विघ्नांचा नायनाट होऊन जीवनाचा मार्ग सरळ होत आहे असा श्रेष्ठ संकल्प करू या.

Continue Reading

मनन शक्ती

मानवी मनाचा व त्यामध्ये असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे.  आज ह्या मनाची गती खूप तीव्र झालेली बघतो.  म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.  एका मिनिटामध्ये २५ ते ३० विचार चालतात.  पूर्ण दिवसामध्ये ४०,००० ते ६०,००० विचार येतात.  जर ह्याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल.  म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे.

शालेय जीवनामध्ये एखादे उत्तर लक्षात राहण्यासाठी पाठांतर करावे लागायचे.  वारंवार त्याच ओळींना मनामध्ये बोलत राहण्याचा अभ्यास केला जायचा.  त्या अभ्यासाने चांगल्या मार्क्सनी पास झालो.  पण जीवनामध्ये सफल व्हायचे असेल तर मनन शक्तीला वाढवण्याची आवश्यकता आहे.  मनन अर्थात एखाद्या बाबीवर केलेले चिंतन.  हे चिंतन चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे असू शकते.  चिंतनाची दिशा जर सकारात्मक असेल तर मन शक्तिशाली बनेल पण तेच नकारात्मक असेल तर मन कमकुवत बनेल.  कारण विचारांचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो हे बघणे आवश्यक आहे.

आज एखादा श्रेष्ठ विचार मनामध्ये आला पण त्याला कर्मामध्ये आणण्याची शक्ती सर्वांमध्ये नसते.  काही विचार मनामध्येच समाप्त होतात.  जसे सागरामध्ये उठणाऱ्या लाटा सागरामध्येच विरून जातात.  तसेच कित्येक विचार मनामध्ये विरून जातात.  एखादा व्यक्ती खूप गरीब असेल, त्याच्यासाठी मोटार, गाडी, बंगला ….. ह्या सर्व गोष्टी स्वप्न असतात.  पण एखाद्याने वारंवार ते प्राप्त करण्यासाठी विचार केला व स्वतःला जाणीव करून दिली की मी हे सर्व काही मिळवू शकतो.  तर नक्कीच ह्या मनन करण्याने त्यांच्यामध्ये ती क्षमता येऊ शकते व तो जे हवे ते प्राप्त करू शकतो.  मोबाईल एक महत्वाचे साधन आहे पण त्याचा वापर करायच्या आधी त्याला रोज कित्येकदा चार्ज करावे लागते.  त्याचप्रमाणे एखाद्या महत्वाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे असेल तर त्याचे मनन करून मनाची शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे.

मननशक्तीला आपण पचनशक्ती सुद्धा म्हणू शकतो.  शरीराला रोज आपण खाऊ घालतो.  खाल्लेले अन्न पचावे म्हणून एका घासाला ३२ वेळा चावावे अशी शिकवण लहानपणी मिळायची.  पचनशक्ती चांगली असेल तर शरीर स्वस्थ, निरोगी बनते.  खाल्लेले अन्न शरीराची शक्ती बनून पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करते. तसेच मनन केल्याने आपली मनाची शक्ती वाढते व विचारांची ऊर्जा निर्माण होऊन कार्यक्षमता बळकट होते.  तसेच मनन केल्याने एखाद्या विचाराला एकसारखे चघळत राहिले तर त्याचा रस आपल्याला मिळतो व तो विचार बुद्धीद्वारे धारण करण्याची शक्ती आपल्यामध्ये येते.  आपणासर्वांना माहित आहे की संबंधांमध्ये सहन करावे लागते, काही परिस्थितीमध्ये ताबडतोब निर्णय घ्यावे लागतात,  आपले विचार सकारात्मक असायला हवे…… खूप काही माहित आहे पण त्याला आत्मसात करण्यामध्ये किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये कोणती शक्ती वापरावी ह्यामध्ये गफलत होऊन जाते.  अशावेळी बुद्धीद्वारे ते करण्याची शक्ती आपल्यामध्ये तेव्हा येते जेव्हा मनन करून ती समज आपण बळकट केलेली असेल.

एक खेळणी विकणारा मनुष्य होता.  त्याच्याकडे ३ बाहुल्या होत्या.  ज्या दिसायला एकसारख्या होत्या.  पण त्यांची किंमत वेगवेगळी होती.  एका बाहुलीची किंमत दहा रुपये, दुसरीची शंभर रुपये तर तिसरीची हजार रुपये होती.  एकदा तो खेळणी विकण्यासाठी निघाला.  फिरत-फिरत तो राजाकडे आला.  राजाला त्या सर्व खेळण्यांमध्ये ह्या तीन बाहुल्या आवडल्या.  त्याने खेळणे विकणाऱ्याला त्यांची किंमत विचारली.  त्यांची किंमत ऐकल्यावर त्याला प्रश्न पडला की असे काय आहे जे ह्यांच्या किंमतीमध्ये इतके अंतर आहे.  तो त्या बाहुल्यांना निरखून पाहतो पण त्याला कळत नाही.  तेव्हा तो खेळणी विकणारा व्यक्ती एक तार काढतो व पहिल्या बाहुलीच्या कानात टाकतो.  ती तार एका कानात टाकल्यावर दुसऱ्या कानातून बाहेर पडते म्हणून तिची किंमत दहा रुपये.  दुसऱ्या बाहुलीच्या कानात टाकतो तर ती तोंडाद्वारे बाहेर पडते म्हणून तिची किंमत शंभर रुपये व तिसऱ्या बाहुलीच्या कानात टाकतो तर ती कुठूनच बाहेर पडत नाही म्हणून तिची किंमत हजार रुपये.  राजा समजून जातो की फरक कुठे आहे.  आपण ही कदाचित असेच करतो, नाही का ?

खूप काही चांगले ऐकतो वा वाचतो.  पण जे ऐकले आहे ते एका कानाने ऐकतो व दुसऱ्याने काढून टाकतो.  त्यामुळे जे चांगले ऐकले आहे, त्याची जीवनामध्ये धारणा न झाल्याने कोणते ही परिवर्तन होत नाही.  कधी-कधी काहींचे जीवन चरित्र वाचतो.  प्रेरणादायी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात.  वाचताना आपण सुद्धा तसे वागावे असे ठरवतो किंवा जे चांगले वाटले त्याचे वर्णन ही करतो.  पण ते तेवढ्या पुरतेच राहते.  कदाचित त्याचा फायदा दुसऱ्यांना होतो.  ही पण कोणाला ही न ऐकवता आपण जर त्या सर्व गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये उतरवल्या तर नक्कीच आपल्या जीवनाची किंमत वाढते.  पण ते आणण्यासाठी मनन करण्याचा अभ्यास असावा.

मनन अर्थात चांगल्या विचारांवर केलेले चिंतन.  हे चिंतन करण्यासाठी स्वतःला व्यर्थ किंवा नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.  जसे एका म्यानामध्ये दोन तलवार राहू शकत नाहीत तसेच एकाच वेळी मनामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही राहू शकत नाही.  जसे शरीराचे स्वास्थ्य सांभाळायचे असेल तर एकाचवेळी आपण उकडलेल्या भाज्या आणि त्याचबरोबर वडा, सामोसा नाही खाऊ शकत.  साधे भोजन खाण्यापाठीमागचा आपला उद्देश सफल होणार नाही.  तसेच व्यर्थ आणि समर्थ दोन्ही प्रकारचे चिंतन एकाचवेळी होऊ शकत नाही.  मला मनन करून विचारांच्या शक्तीचा अनुभव करायचा असेल तर मला व्यर्थपासून मुक्त राहून समर्थ संकल्पांचे मनन करण्यासाठी विशेष वेळ काढायला हवा.

ह्या मनन शक्तीने एका साधारण दृश्यावर मनन करून न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला.  अर्थातच मनन चिंतन केल्याने आपण सत्याचा शोध लावू शकतो.  जसे जमिनीमध्ये लपलेले खजाने शोधून काढण्यासाठी जमिनीला कितीतरी फूट खोदावे लागते तसेच विचारांच्या खोल दरीत गेल्यावरच आपण अमूल्य रत्न ( बहुमोल विचार ) प्राप्त करू शकतो.  जीवनाचा मार्ग सहज आणि सरळ बनवायचा असेल तर सकारात्मक चिंतन करून मनाला शक्तिशाली बनवा.  मनन करून जीवनाचे रहस्य समजून घ्या.  स्वतःचेच शिक्षक बनून जीवनाचे धडे शिकवा.  ह्या चंचल मनामध्ये किती शक्ती लपली आहे ह्याचा अनुभव घ्या.

Continue Reading

जागते रहो

बचपन में गांव में या शहरों में रात के समय पर पहरेदार आवाज लगाते थे ‘जागते रहो’ |  कई बार मन में सवाल उठता था कि  रात का समय है, सोने का समय है फिर ये क्यू कहते है कि जागते रहो ?  लेकिन न वह बात समझ में आती थी, ना कभी किसी से पूछा |  लेकिन आज उसका अर्थ समझ रहे है कि दिन हो या रात हम सभी को इस समय पर जागृत रहना कितना जरुरी है | भक्तिमार्ग में गणपति या नवरात्रि के दिनों में जागरण करते है |  रात जाग कर निकालते है |   कई उसमें  भगवान के भजन किर्तन गाते है, प्रवचन सुनते है, तो कई ताश खेलते हुए भी नजर आते है |  इस ‘जागरण’ या ‘जागते रहो’ का अर्थ क्या है ?

एक वक्त था जब इन्सान को गलत कर्म जैसे चोरी, खून, बलात्कार। ……..  करना होता था तो रात को करते थे |   समझते थे किसी को पता नहीं चलेगा कि इस अंधेरे में ये काम किस ने किया है |  लेकिन आज सारे गलत कर्म दिन दहाड़े भी होते है | कहते है ये कलयुग रात है अर्थात ही ये पूरा ही रात्रि का समय है जिस में कुकर्म की प्रेरणा मनुष्य के मन में दिन प्रतिदिन बढ़ती जा रही है |  एक है अज्ञानता का अंध:कार , जिसमें मनुष्य सही राह कि तलाश में है | जीवन में बढ़ती समस्याओं के बीच सही निर्णय लेने की क्षमता वह खो बैठा है |  ज्ञान की रोशनी का एक किरण भी मिल जाए, उसकी खोज में भटक रहा है |   शास्त्रों के पन्नों को पलटकर देखा, गुरुओं के प्रवचन को सुनकर देखा, कई कर्मकांड भी किए परंतु वो खोज सफल नहीं हुई |   ऐसा सुख-शांति, प्यार के लिए भटकता हुआ मानव देख रहे है तो दूसरी ओर  मोह, लालच, नफ़रत की आग में जलता हुआ मानव विकारों के कारण खुद की तथा दूसरों की तबाही करता हुआ नजर आ रहा है |

बचपन में भूतों की कहानी सुनते थे तब एक चीज कॉमन होती थी जिस में रात में भूतों का प्रभाव बताया जाता था |   आज हम मनुष्य की वृत्ती में बसे हुए काम, क्रोध जैसे विकारों के किस्से सुनते है |   हिंसक वृत्तीयों को बढ़ता देखते है |   ऐसे समय पर सतर्क रहना आवश्यक है |  किसी की गलत वृत्ती का शिकार हम तो नहीं हो रहे ?  या मेरी ही कोई गलत मनोधारणा से किसी का नुकसान तो नहीं हो रहा ?  इसलिए ‘जागते रहो’ का मंत्र याद रखना है |  जैसे अंधेरे में एक-एक कदम संभल-संभलकर रखते है वैसे मुझे इस दुनिया में हर कर्म संभलकर करना है |  जागृत होकर चलना है |  हम घर में तो रोशनी करते है परंतु घर के बाहर भी प्रकाश हो इसका ध्यान देते है वैसे ही मेरे अंदर कोई भूत जन्म तो नहीं ले रहा ?  गुस्सा, ईर्ष्या, स्पर्धात्मक वृत्ती, कामुकवृत्ती बढ़ तो नहीं रही इस पर तो ध्यान देना ही है |   ज्ञान का दीपक पहले मेरे मन में जलाना है फिर बाह्य विश्व में भी यह बढ़ रही है लेकिन इसमें में कैसे सुरक्षित रहूँ इस पर भी ध्यान हो जिस को ही सच्चा जागरण कह सकते है |

वर्तमान समय रात को भी दिन बनाने की विज्ञान की शक्ति हम देख रहे है परंतु  सच्चा सुख किस में है, सफलता या सच्ची प्राप्ति किसे कहेंगे, कौनसी दौड़ को जीतना चाहिए ऐसे कई सारे सवालों के जवाब देनेवाले ज्ञान की रोशनी मनुष्य के पास नहीं है इसलिए आज भी भौतिकता में फॅसा हुआ मानव ठोकरे खा रहा है |  गलत पथ पर जा रहा है |  इस मायावी नगरी में भूले करता जा रहा है इसलिए जागृत रहना है |  न हम से भूले हो, न किसी को भूले करने देना है |  ज्ञान की सही राह पर चलना है |  ऐसे भी शायद हो सकता है कि इस समय पथपर चलने में हजारों मुश्किलें आए मगर सही दिशा में आगे बढ़ना है |

कहते भी है ‘सत्य का मार्ग बड़ा कठीन है’ इसलिए झूठ बोलना सहज लगता है |  जीवन में ऐसे कई शॉर्टकट लेते है लेकिन यही हमारे लिए मुश्किलों का जाल बनाते है |  छोटे-छोटे कर्मों में उलझकर आसान जिंदगी को कठीन बनाते है |   थोडासा जागरण हमें बेहतरीन पल दे सकता है इसलिए ‘जागते रहो’ |

Continue Reading