Comfort Zone

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये व्यक्ती, स्थान, साधन, वातावरण,….मिळाले आहे. आयुष्याची बांधणी त्या अनुसार करत आपण सर्व पुढे चालत आहोत. मनासारखे सर्व काही मिळेल अस नाही, पण जे लाभले त्यामध्ये सुद्धा जे आवडले, त्या प्रमाणे स्वतःला घडवत असतानाच कधी कधी आपल्याला मनाविरुद्ध बाहेर पडावे लागते. जसे काहींची नोकरीच अशी असते कि त्यांना काही वर्षांनी स्थानांतरण करावे लागते. पण जिथे राहिलो त्या घराबरोबर,शेजाऱ्यांबरोबर किवा तिकडच्या वातावरणा अनुसार राहण्याचा सराव करत असतानाच पुन्हा नवीन ठिकाणी जावे लागणार हा विचार मनाला अस्वस्थ करतो. प्रत्येक वेळी स्वतःला बदलत रहावे लागते, कित्येकदा मनुष्य हताश ही  होतो कि पुन्हा नव्याने सर्व काही करावे लागणार. पण जीवन म्हणजे परिवर्तन.
जीवनाच्या प्रवासाला निरखून पहिले तर वेळ, वय ह्या अनुसार आपण बदलतच असतो. हा बदल मान्य असतो. पण व्यक्ती, स्थान, नोकरी, साधन ह्यांना वारंवार बदलावे लागले तर ते नेहमीच स्वीकार्य नसते.त्या सर्वांशी झालेला लगाव आपल्याला दुःखी करून सोडतो. जसे एखाद्या व्यक्ती बरोबर आपले घनिष्ट संबंध जोडले गेले असतील तर त्या पासून दूर होणे हा विचारच आपल्याला कष्ट देतो. व्यक्ती, घर हेच काय पण रोज एका ठिकाणी बसून TV बघत असाल किवा झोपत असाल, ह्याहून ही अधिक जर आपला ग्लास, पेन, चमचा.. ह्या गोष्टी ही मनाला बांधून ठेवतात. त्या वस्तू कधी दुसरा कोणी वापरत आहे असे दिसून आले तरी मनाला कससच होते. होय कि नाही? म्हणजेच तुम्ही स्वतः ला त्या जागेशी एकरूप केल होत.त्या जागेबद्दल प्रेम, त्यापासून मिळणारा आराम ह्यांना स्वतः शी जोडल होत. थोड्या वेळासाठी त्या ठिकाणाशी तुटलेलं नात हे मनाला स्वीकार होत नाही कारण त्या स्थानाने जो आराम दिला होता तो मनाला सुखद अनुभवत होता. ते सुख न मिळाल्याने मनामध्ये चलबिचल सुरु होते. खाण्या-पिण्यामध्ये हाच brand हवा , हीच आणि अशीच वस्तू हवी ती नाही मिळाली तर काहीतरी चुकल्यासारखे किवा त्याची उणीव जाणवत राहते. अश्या अनेक गोष्टींची सवय आपण लावून घेतली आहे. त्यातून बाहेर पडणे कठीण. कारण ते आपले ‘comfort zone’ आहे. व्यक्तीने त्या अनुरूप स्वतः ला घडवले आहे. त्यातून बाहेर पडणे म्हणजे एक नवीन तडजोड.
पण खरतर ह्या comfort zone मध्ये मनुष्य कुठेतरी आपला विकास थांबवतो; जसे एखादे तलाव. पाणी साचलेले असते, पाण्याची पातळी तेव्हा वाढते जेव्हा पाऊस पडतो. बाकीच्या वेळी त्या पाण्याचा स्तर तेवढाच राहतो. तसेच मनुष्य एखाद्या विशिष्ट वातावरणात राहणे पसंद करतो. मग त्याची प्रगती फक्त त्या अनुसारच होते. पण त्यातून बाहेर पडून स्वतः च्या गुणांना, कलांना सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतः ला ओळखतो. त्यावेळी त्याला आपली क्षमता, उणीवा, गुण ह्यांची समज मिळते. म्हणून एकाच वातावरणा मध्ये राहण्याची सवय न लावता, कोणत्याही व्यक्ती, स्थान, परिस्थिती मध्ये राहू शकू असे स्वतः ला घडवावे. जे पाश आपण स्वतः ला घातले आहेत ते आपल्या प्रगतीला ही बाधक आहेत. उन्नतीच्या शिडीवर चढायचे असेल तर अशी गोड बंधने तोडून बाहेर पडा. जसे एखादे पिल्लू घरट्या मध्ये आहे, सुरक्षित आहे. पण उंच भरारी घ्यायची असेल तर त्याला ही आपल्या पंखांना फडफडावे लागते. घरट्या बाहेरचे जग बघण्यासाठी प्रयंत्न करावा लागतो. कारण काही कमावण्यासाठी काही गमवावे लागते. आपण ही तशी तयारी ठेऊ या. नाहीतर हा comfort zone आपल्या विकासाच्या मार्गातील खूप मोठा अडथळा होऊन जाईल. स्वतः चे परीक्षण करा व असे अडथळे दूर करा.

You may also like