Home

प्रिय वाचकांनो ! मी ‘ ब्रह्माकुमारी नीता’ चा तुम्हाला सहृदय प्रणाम .  अध्यात्मिक जीवनाच्या २० वर्षाच्या कालावधीमध्ये मी जे अनुभवले, जीवनाचे मर्म समजले ते सत्य तुमच्या बरोबर share करण्याचा छोटासा हा प्रयत्न

 

‘ अन्तर – नाद ’ हा माझ्या आणि तुमच्या मनाचा आवाज आहे. परिस्थितींचे वारे जेव्हा वाहतात तेव्हा हे मनरूपी पाखरू कधी घाबरते तर कधी मलूल होऊन जाते अशा वेळी त्याला विचारांची कशी ऊब  द्यावी, प्रेमाची शक्ती देऊन कसे त्याला जीवनाच्या आकाशामध्ये उडण्याचे पंख द्यावे, सुखाच्या थंड विसाव्यात काही क्षण घालवावे  ……..  यावर ज्ञानाचा प्रकाश टाकणारा हा blog आहे.

 

आयुष्याचे उरलेले क्षण आनंदाने जगण्याची कला तसेच नाती कोणती ही  असो पण त्याचे महत्व, एकमेकांसाठी जिव्हाळा आणि त्यासाठी आवश्यक असलेला समजुतदारपणा  कसा वाढवावा. शरीराचे संबंध आणि त्याचबरोबर ईश्वराशी नाते जोडून प्रभुप्रीतीची रंगत आपल्या जीवनात कशी आणावी ह्याचा खुलासा ही ह्या लेखणीच्या माध्यमाने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न

 

स्पंदन, विचारांना सकारात्मक बनवा,  क्रोधावर नियंत्रण, एक प्रश्नचिन्ह  ……… अश्या अनेक विषयांची प्रस्तुती तुमच्यासाठी होणार आहे.

 

विचारांच्या ह्या प्रवासामध्ये माझ्या सोबत रहा, अनुभवांचे गाणे गुणगुणत, सुखांची रम्य दृश्य बघत  …….. यशाच्या शिखरावर पोहोचू या.