भारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो. भारताची प्राचीन संस्कृति ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ’ ह्या मार्गाने पुढे चालणारी, अंधःकारातुन प्रकाशाकडे नेणारी मानली जाते. म्हणून प्रत्येक सणामध्ये, प्रसंगामध्ये दीप प्रज्वलन, दिवा लावणे …. ह्या प्रथा दिसून येतात. पण आज हीच संस्कृती अंधःकाराकडे जात आहे. वाढदिवसाच्या दिवशी ओवाळणी करून, तिलक लावून शुभकामना देण्याची पध्दत आज मेणबत्ती विझवून Happy Birthday बोलणारी झाली आहे.
भारताची प्राचीन संस्कृती विसरुन पाश्चात्य देशाची भोग-विलासी संस्कृतीला आपण हात मिळवत आहोत. ‘ भूक लागल्यावर खाणे ही आहे प्रकृती, भूक लागल्यावर दुसऱ्याच्या हातचे काढून खाणे ही आहे विकृती, पण खात असताना कोणी आले तर त्याला हि खावयास देणे ही आहे संस्कृती.’ ही संस्कृती भारतामध्ये ‘ अतिथी देवो भव ’ म्हणून सांभाळताना दिसते. घरी आलेला पाहुणा देवाचेच एक रूप समजून त्याचा पाहुणचार प्रेमाने केला जातो. अनेक पध्दती आणि अनेक उत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन करवतात. प्रत्येक उत्सव आणि प्रथा ह्या पाठीमागे अनेक रहस्य लपली आहेत पण त्या रहस्यांना कधी जाणून घेतले नाही म्हणून आज तसे आपल्यामध्ये संस्कार ही दिसून येत नाहीत.
संस्कार आणि संस्कृती ह्यांचा संबंध समजून घेण्यासारखा आहे. संस्कार अर्थात दैनंदिन जीवनामध्ये नियमितता आणणे, व्यवहारामध्ये सद्गुणांचा समावेश करणे, प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्यता आणून धर्मयुक्त कार्य करणे हे संस्कारित असण्याची निशाणी आहे. अश्या संस्कारी मनुष्यानी अनेकांना जीवन जगण्याची कला शिकवली त्या कलेला संस्कृति म्हटले जाते.
वर्तमान परिस्थिति मात्र वेगळी दिसून येते. विज्ञानाने मनुष्याला अनेक साधन आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु त्याच बरोबर आपली मानसिकता ही दिवसेंदिवस बदलत गेली. अनेक चुकीच्या समजुती समाजामध्ये पसरत गेल्या आणि हीच सुंदर संस्कृती आज लोप होताना दिसत आहे. शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी विदेशात गेलेला भारतीय युवावर्ग तिथली स्वच्छंद जीवन पध्दतीच्या आहारी जात आहे. पैशाच्या मोबदल्यात भारतीय संस्कृतीला पणाला लावत आहे. स्वतःचे संस्कारी जीवन सुद्धा गहाण ठेवत आहे. एके काळची म्हण होती कि ‘ धन गेले तर काही गेले नाही, तन गेले तर थोडे काही गेले, पण चरित्र गेले तर सर्व काही गेले.’ आज हीच म्हण उलटी झाली आहे. ‘चरित्र गेले तर काही हरकत नाही, तन गेले तर थोडेसे नुकसान झाले, पण धन गेले तर सर्वस्व गेले.’
आज कोणी कितीही धनाढ्य असला तरी त्यांच्याकड़े गुणांची, चांगल्या संस्कारांची गरिबी दिसून येते. भारत संतांची, महात्म्यांची अनेक योगींची जन्म-भूमी आहे. त्यांच्या पवित्र जीवनाचा सन्मान करून आपण ह्या प्राचीन संस्कृतीला जपण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. ह्यासाठी आपण स्वतः सुसंस्कारी बनण्यासाठी प्रयत्नशील राहू या कारण आज प्रत्येक मनुष्यामध्ये कोणत्या न कोणत्या वाईट सवयी आहेत. कदाचित ह्याच सवयी ज्यांना संस्कार म्हंटले जाते, ह्यामुळेच आपण दुःखी आहोत. सूक्ष्म आणि स्थूल सवयींना बदलण्यासाठी प्रत्येक कर्मांवर लक्ष्य ठेवायला हवे. कारण ह्या कर्मांची शृंखला संस्कारांना जन्म देते आणि हेच शक्तिशाली संस्कार आपल्याकडून वारंवार तेच कर्म करून घेतात. संस्कारांच्या आहारी जाऊन पुन्हा-पुन्हा त्याच कर्मांची पुनरावृत्ती होते. कर्म आणि संस्कार ह्या मध्ये एक सूक्ष्म धागा आहे जर त्याला जाणीवपूर्वक, युक्तीने तोडण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आले तर पूर्ण जीवनच बदलून जाईल.
‘ आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. पण मनुष्य जीवन त्याच्या कुटुंबाला, समाजाला तसेच देशाला घडवते. आपले सुसंस्कारी जीवन नवीन संस्कृतीला जन्म देऊ शकेल. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे. चला तर मग आपल्या श्रेष्ठ कर्मांचे बीजारोपण करून सुंदर संस्कारांनी नवीन संस्कृतीची बाग फुलवू या. ह्या बागेमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुणांचा सुवास, उत्साहाचा झोपाळा, प्रेमाची सावली लाभेल जेणेकरून त्याचे जीवन ही सुगंधी बनेल.
10 Comments
accutane otc drug
alavert tablets
alli orlistat 60mg
tizanidine 4 mg coupon
generic viagra online purchase
viagra for cheap
legit essay writing websites
can you buy cialis online in canada
order levitra over the counter
naltrexone 1.5 capsule https://naltrexoneonline.confrancisyalgomas.com/