फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये एक आश्रम होते. जिथे गुरुंबरोबर काही शिष्य राहायचे. एकेदिवशी गुरूंनी आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी शिष्याला एक साधारणसा दगड दाखवला व विचारले की ‘ ह्या दगडाची किंमत काय असेल ? ’ शिष्य आश्चर्याने त्या दगडाकडे पाहत राहिला . चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते कि ह्या दगडाची अशी काय किंमत असेल ? बुचकळ्यात पडलेल्या शिष्याला बघून गुरु म्हणाले, ‘ जा, जरा बाजारात जाऊन ह्याची किंमत काय असावी ते विचारून ये ’. पण लक्षात ठेव की हा दगड कोणालाही विकायचा नाही.’
शिष्य बाजाराकडे निघतो. रस्त्यामध्ये त्याला एक शेतकरी भेटतो. त्याला थांबवून तो विचारतो कि ‘आपण मला सांगू शकाल की ह्या दगडाची तुम्ही काय रक्कम देऊ इच्छिता ?’ शेतकरी त्या दगडाला हातामध्ये घेऊन सहजरीत्या म्हणतो कि ह्याची ती काय किंमत? एक रुपया ठीक आहे.’ शिष्य त्यांच्याकडे बघतो व मनातल्या मनात विचार करतो की माहित नाही हा काय प्रकार आहे. पुढे जाऊन तो एका दुकानाजवळ थांबतो व दुकानदाराला विचारतो कि ह्या दगडाची काय किंमत असू शकेल? दुकानदार उत्तर देतो ‘ १० रुपये’. शिष्य कुतूहलाने त्याच्याकडे बघत राहतो. त्याच्या मनामध्ये येते की आणि दोन-चार व्यक्तींना विचारायला हवे. तो एका दागिन्यांच्या दुकानाकडे जाऊन सोनाराला विचारतो. सोनार सांगतो ‘मी ह्याचे हजार रुपये देऊ शकतो.’हे ऐकून शिष्य तोंडात बोट घालतो. आता मात्र त्याच्या मनातली उत्सुकता वाढते व तो त्या गावातल्या राजाकडे जातो व विचारतो ‘राजन, तुम्ही ह्या दगडाची काय किंमत आकाराल ?’ राजा त्या शिष्याकडे बघत म्हणतो ‘ ह्या दगडाच्या किंमतीमध्ये मी माझे पूर्ण राज्य द्यायला तयार होईन.’ शिष्य हे ऐकून पूर्णपणे गार होतो. तो त्या दगडाला परत घेऊन धावत-धावत आश्रमात पोहचतो.गुरूंच्या समोर जाऊन प्रश्न करतो कि ‘गुरुदेव ,मला खर सांगा. हा दगड नक्की काय आहे? राजा तर दगडाच्या बदल्यात पूर्ण राज्य द्यायला तयार आहे. हा दगड……’ तेव्हा गुरु शांत मुद्रेने उत्तर देतात ‘ह्या दगडाला पारस म्हणतात. लोखंडाला जर ह्याचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते. समजले …… हा साधारण दगड नाही.’
लोखंडाला पारस स्पर्श झाला की त्याचे रूपांतर सोन्यामध्ये होते अर्थातच मूल्यहीन वस्तू ही मूल्यवान होते. एखादे तान्हे बाळ ज्याला बोलता ही येत नाही त्याला सुद्धा स्पर्शाने आपल्या आईची ओळख होते. ढगांना थंड हवेचा स्पर्श झाला की पाऊस पडायला लागतो. एखादया ओसाड जमिनीला पाऊसाच्या पाण्याचा स्पर्श होतो तेव्हा चहूकडे हिरवे गालिचे पसरतात. प्राण्यांना सुद्धा स्पर्शाद्वारे त्यांच्यावर माया करणाऱ्यांची ओळख पटते. ह्या सर्व स्पर्शाना शब्दांची गरज नाही. पण ह्या स्पर्शामध्ये प्रेमाची स्पंदने भरलेली आहेत.
दैनंदिन जीवनामध्ये ही प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आवश्यक आहे. ‘knowledge is source of income.’ म्हंटले जाते. धनवान बनण्यासाठी ज्ञानवान असणे जरुरी. पण आज फक्त स्थूल धन जगण्यासाठी आवश्यक आहे अस ही नाही. जीवनाची कितीतरी सत्ये परिस्थितीद्वारे आपल्यासमोर स्पष्ट होतात. परंतु त्या वेळी परिस्थिती आपला शिक्षक बनते. सत्याचा बोध होण्यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा स्पर्श आपल्या बुद्धीला होण्याची गरज आहे. ज्या द्वारे समस्यांचे समाधान सहजरीत्या आपण करू शकतो. योग्य निर्णय घेण्याची शक्ती आपणास मिळते.
लहान असताना शिकवले जायचे की ‘ देवाला सांग, मला चांगली बुद्धी दे,’ पण बुद्धी तर सर्वानाच प्राप्त आहे पण सत्यज्ञान, ईश्वराचे प्रेम ह्यांचा स्पर्श जेंव्हा बुद्धीला होतो तेंव्हा जीवनामध्ये आश्चर्यजनक परिवर्तन घडून येतात. मग त्यासाठी कोणा व्यक्तीची, कायद्याची किंवा बंधनाची गरजच लागत नाही. ते परिवर्तन आपसूकच होऊन जाते. म्हणूनच ईश्वराला ‘पारसनाथ’ ही म्हटले जाते. ज्याच्या स्पर्शाने आपली बुद्धी सोन्यासारखी पवित्र बनते.
5 Comments
Khupch chan.chan chan .Good serving.Excellent too.
generic viagra sales
sildenafil online singapore
trump stops taking hydroxychloroquine https://hydroxychloroquine.webbfenix.com/
how much is sildenafil 100mg